गोंदी, ता. कराड येथील एका सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याला सुमारे दीड लाखांचा ऑनलाईन गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. बँकेचे अॅप्लिकेशन बंद पडल्याची सबब सांगून त्यांच्या खात्याची माहिती घेऊन चोरट्याने फसवणूक केली आहे.
म्हासुर्णे, ता. खटाव येथे झालेल्या मारहाणीत एकजण जखमी झाल्याची घटना घडली.
बोबडेवाडी, ता. कोरेगाव येथे एकाने विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली.
गरम पाण्याच्या बादलीत हात घातल्याने एक दीड वर्षाचा मुलगा जखमी झाल्याची घटना घडली.
सातारा जिल्ह्यातील वयस्कर महिलांना लक्ष्य करून चेन स्नॅचिग करणाऱ्या पोलिस रेकॉर्डवरील संशायिताकडून चार जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्यांच्याकडून सुमारे २ लाख ६० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक अजय बन्सल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सध्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर लोक बाहेर पडत आहेत. मात्र, कोरोना अद्यापही पूर्णपणे गेलेला नसून नागरिक बिनधास्तपणे वावरत आहेत. शिवाय, मास्कचाही वापर करताना दिसून येत नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका संभवत असल्याने नगरपालिकेकडून शहरातील बाजारपेठेसह शहरातील मुख्य रस्ते सॅनिटायझ करून घेण्यात येत आहेत.
सातारा सर्व दुचाकी वाहनांसाठी एमएच 11-DE मालिका 0001 ते 9999 पर्यंत संगणकीय वाहन 4.0 प्रणालीवर 3 नोव्हेंबर पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती सातारा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिली आहे.
जिल्ह्यात मतदार नोंदणी पुररिक्षण कार्यक्रम 2022 मोहिमेस आरंभ झाला असून त्यानुसार एकत्रीकृत प्रारुप यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. या मोहिमेत जिल्हय़ातील 18 वर्षांपुढील नवीन मतदारांनी नोंदणी करावी. यासाठी नोव्हेंबर महिन्यात 13, 14, 27 व 28 नोव्हेंबर 2021 रोजी विशेष मोहिम राबवण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली.
सदर बझार येथील हनुमान मंदिर याठिकाणी काही समाजकंटकांकडून हनुमान मूर्तीची विटंबना करण्यात आली. त्याबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना निवेदनाद्वारे मूर्ती विटंबना करणार्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर भारतीय जनता पार्टी व हिंदू एकताचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व त्यांचे सहकारी यांनी त्या ठिकाणी जाऊन दुग्धाभिषेक करून मूर्तीचे शुद्धीकरण केले व महाआरती करण्यात आली.
ऐतिहासिक शाहूनगरीत वसुबारसच्या निमित्ताने येथील पंचपाळे हौद येथे गोधनाचे पारंपारिक पध्दतीने पूजन करण्यात आले. वसुबारसच्या पूजेने साताऱ्यात दीपोत्सवाचा अर्थ त दिवाळीचा जल्लोष सुरू झाला असून सातारकरांचा सुध्दा दिवाळी खरेदीचा उत्साह उतू जाऊ लागला आहे. राजपथासह वर्दळीच्या मोती चौकाला आज जत्रेचे स्वरूप आले होते.