maharashtra

दुकान फोडून साहित्य चोरणारे दोघे ताब्यात

स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाची कारवाई

The two who broke into the shop and stole materials were arrested
सातार्‍यातील करंजे येथे दुकान फोडून त्यातून 50 हजार रुपयांचे साहित्य चोरणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) ताब्यात घेतले. त्यातील एकजण अल्पवयीन असून संशयितांकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, एका दिवसात पोलिसांनी हा गुन्हा ओपन केला आहे.

सातारा : सातार्‍यातील करंजे येथे दुकान फोडून त्यातून 50 हजार रुपयांचे साहित्य चोरणार्‍या दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने (एलसीबी) ताब्यात घेतले. त्यातील एकजण अल्पवयीन असून संशयितांकडून चोरीचा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, एका दिवसात पोलिसांनी हा गुन्हा ओपन केला आहे.
अभिषेक गणेश आवारे (रा.आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याचा साथीदार अल्पवयीन असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, दि. 30 रोजी मध्यारात्रीच्या सुमारास अज्ञातांनी करंजे पेठेतील विमल एन्टरप्रायझेस नावाचे दुकान फोडले. चोरट्यांनी दुकानातून सीसीटीव्ही कॅमेरे फोडून नटबोल्ट, वायसर असे साहित्य चोरुन नेले. ही घटना दि. 31 रोजी समोर आली. वर्दळीच्या ठिकाणी घरोफडी घडल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. तक्रारदार यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रार दाखल झाल्यानंतर एलसीबीचे पोलिसही या घटनेचा तपास करत होते. याचरदम्यान पोलिसांना चोरट्यांबाबतची माहिती मिळाली.
पोलिसांनी एकाला ताब्यात घेतल्यानंतर त्याने चोरीची कबुली देवून दुसर्‍या साथीदाराचे नाव सांगितले. त्यानुसार पोलिसांनी दोघा संशयिताकडून चोरीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही संशयितांचे वय तपासले असता एकजण अल्पवयीन असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी दोघांविरुध्द कायदेशीर कारवाई करुन संशयितांचा ताबा शाहूपुरी पोलिसांकडे दिला.
पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, पोनि किशोर धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि आनंदसिंग साबळे, फौजदार गणेश वाघ, पोलिस हवालदार संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, प्रवीण फडतरे, मुनीर मुल्ला, निलेश काटकर, रोहित निकम, विशाल पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला.