न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी समीर विनोद देखणे, रा. वाढे, ता. सातारा त्याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जण बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा तालुक्यात दोन वेगवेगळ्या जुगार अड्डयांवर छापे टाकून पोलिसांनी सुमारे ८७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.
लोणंद पोलिस ठाणे हद्दीतील मौजे तरडगाव तालुका फलटण येथे बसस्थानकासमोर नाकाबंदी करीत असताना. लोणंद ते फलटण जाणारे रोडवर एक शेवरलेट कंपनीची संशयित कार दिसल्याने सदर कारची झडती घेतली असता त्यामध्ये एक लोखंडी तलवार मिळून आल्याने सदर संशयित नाव गणेश विठ्ठल गायकवाड वय 30 राहणार तरडगाव तालुका फलटण याच्यावर लोणंद पोलीस ठाणे शस्त्र अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरेगाव विधानसभा मतदार संघातील बोरखळ ता. सातारा या गावामध्ये एक काँक्रिटीकरणचा रस्ता व बंदिस्त गटर आदी विकासकामे झाले असून ही विकासकामे आमदार, खासदार की अन्य फंडातुन झाले हे गावकऱ्यांनाही माहिती नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना या कामाची माहिती द्यावी म्हणून निवेदन वजा पत्र लिहिले.
जिल्हयातील सर्वसामान्यांचे आणि शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सदैव कार्यरत असलेली व उत्कृष्ठ आर्थिक नियोजनातून सक्षम असणारी माझी बँक, आपली हक्काची बॅंक म्हणून सातारा जिल्हा बॅंकेकडे पाहिले जाते.
जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर नियोजन आवश्यक आहे. नियोजन करण्याची सवय लागली पाहिजे. स्थिर, ठामपणा, भावनावर नियंत्रण आणि प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवता आले पाहिजे. संकटांची भीती आपल्याला मारुन टाकते. त्यामुळे स्वतःच्या भावभावनांचे नियोजन हाच यशाचा खरा पासवर्ड असल्याचे मत इतिहास अभ्यासक, सुप्रसिध्द वक्ते प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांनी व्यक्त केले.
प्रत्येक व्यक्तीला जीवनात शिक्षणाची व्यवसाय प्रशिक्षणाची गरज आहे तितकीच स्वयंसिद्धा कार्यशाळेची सुद्धा आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक भावेश भाटिया यांनी केले.
सातारा जिल्ह्यातील अनेक आमदारांनी नावलौकिक प्राप्त केले आहे. पक्ष वाढीसाठी योगदान दिले पण, माण-खटाव भाजपचे विद्यमान आमदार जयकुमार गोरे यांनी तेरा वर्षात अपक्ष, काँग्रेस व भाजप कडून मिळवलेल्या आमदारकीची टर्म आपल्या कर्तबगारीने कोर्ट कचेरीत घालवली, असा थेट आरोप माण चे सामाजिक कार्यकर्ते अजिनाथ केवटे यांनी केला आहे.
जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी जिल्हास्तरीय अंमली पदार्थ विरोधी कार्यकारी समितीची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस विभाग व इतर विभागांच्या समन्वयातून 1 मे ते 31 मे 2022 या कालावधीत जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्रेत्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी दिली.