maharashtra

अंध व्यक्तीच्या शिक्षणासाठी स्वयंसिद्ध कार्यशाळेची गरज

उद्योजक भावेश भाटिया यांचे प्रतिपादन

The need for self-help workshops for blind education
प्रत्येक व्यक्तीला जीवनात शिक्षणाची व्यवसाय प्रशिक्षणाची गरज आहे तितकीच स्वयंसिद्धा कार्यशाळेची सुद्धा आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक भावेश भाटिया यांनी केले.

सातारा : प्रत्येक व्यक्तीला जीवनात शिक्षणाची व्यवसाय प्रशिक्षणाची गरज आहे तितकीच स्वयंसिद्धा कार्यशाळेची सुद्धा आहे असे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक भावेश भाटिया यांनी केले.
सातारा व सुवर्धीनी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अंधांसाठी दोन दिवस कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते.
यावेळी नॅब सातारा शाखेचे अध्यक्ष पांडुरंग शिंदे, प्रशिक्षक स्वागत थोरात, सुवर्धीनी फाउंडेशनचे अध्यक्ष सुवर्णा बोबडे, नीता भाटिया, कार्यशाळा समन्वयक स्वरूपा देशपांडे, सुवर्धीनी चे उपाध्यक्ष दीप्ती कुलकर्णी, सदस्या वैशाली मंडपे, डॉक्टर शुभांगी काटकर, धनश्री पाटील, डॉक्टर पल्लवी शिंदे इत्यादी मान्यवर उपस्थित होते
भावेश भाटीया पुढे म्हणाले शिक्षण आणि रोजगाराच्या दिशेने पुढे जायचे असेल तर सर्वप्रकारे स्वयंपूर्ण होण्यासाठी अशा कार्यशाळा मोठ्या संधी असतात या कार्यशाळेचा लाभ अंध बांधवांनी जरूर घ्यावा स्वयंसिद्ध त्यामुळे आपण भारतातच नव्हे तर जगभरात मध्ये फिरू शकलो असेही त्यांनी सांगितले
स्पर्शज्ञान ब्रेल पाक्षिकाचे संपादक आणि ब्रेल बँक ऑफ इंडिया जगभरात ओळखले जाणारे स्वागत थोरात यांनी यावेळी अंधांना प्रशिक्षण दिले यामध्ये पांढऱ्या काडीचा उपयोग करणे तसेच दिशा कडधान्य भाज्या इत्यादि ओळखणे विविध प्रकारचे खेळ कसे खेळावेत याचे प्रशिक्षण यावेळी देण्यात आले.
कार्यशाळेस सातारा शहर आणि परिसरातील अंध बांधव आणि पालक सहभागी झाले होते. अध्यक्ष पांडुरंग शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले अडवोकेट सुचित्रा काटकर यांनी मान्यवर पाहुण्यांची ओळख करून दिली वैशाली मंडपे दीप्ती कुलकर्णी श्रद्धा अवसरे अस्मिता सोनटक्के यांनी पाहुण्यांचे स्वागत केले शुभांगी दळवी यांनी सूत्रसंचालन केले व अर्चना काटकर यांनी आभार मानले.