कोरेगाव मतदार संघात बोरखळमध्ये झाले जादूने विकासकाम : रमेश उबाळे
जिल्हाधिकाऱ्यांना दिले पत्र, काम कशातून झाले जिल्हाधिकाऱ्यांनाही पत्ता नाही
कोरेगाव विधानसभा मतदार संघातील बोरखळ ता. सातारा या गावामध्ये एक काँक्रिटीकरणचा रस्ता व बंदिस्त गटर आदी विकासकामे झाले असून ही विकासकामे आमदार, खासदार की अन्य फंडातुन झाले हे गावकऱ्यांनाही माहिती नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना या कामाची माहिती द्यावी म्हणून निवेदन वजा पत्र लिहिले.
पुसेगाव : कोरेगाव विधानसभा मतदार संघातील बोरखळ ता. सातारा या गावामध्ये एक काँक्रिटीकरणचा रस्ता व बंदिस्त गटर आदी विकासकामे झाले असून ही विकासकामे आमदार, खासदार की अन्य फंडातुन झाले हे गावकऱ्यांनाही माहिती नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे सरचिटणीस रमेश उबाळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना या कामाची माहिती द्यावी म्हणून निवेदन वजा पत्र लिहिले. परंतु हे पत्र देवून १३ ते १४ दिवस झाले जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत उत्तर दिले नाही. त्यामुळे बोरखळमध्ये झालेले विकासकाम हे जादूने झाले की काय? असा सवालही त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोरखळ येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ते गारी चौकापर्यंतचा काँक्रिटिकरण रस्ता व बंदिस्त गटरचे काम पूर्ण झाले आहे. याबाबत रमेश उबाळे यांनी बोरखळ गावात सदर काम आमदार, खासदार की अन्य फँडातून झाले आहे याबाबत माहिती घेतली परंतु गावातील हे काम कोणत्या फँडातुन झाले याबाबत माहिती नव्हती वास्तविक काम कोणत्याही शासकीय फँडातुन मंजूर होवो भूमिपूजन करणयासाठी मंत्री, आमदार, खासदार किंवा सरपंच येऊन भूमिपूजन करून नारळ फोडून जातात परंतु या विकासकामाचे ना कुणी भूमिपूजन केले ना कुणी नारळ फोडला असे घडलेच नसल्याचे उघड झाल्यानंतर रमेश उबाळे यांनी थेट सदर काम कोणत्या योजनेतून झले या कामाचे मूल्यांकन किती आहे? याबाबत माहिती देण्यात यावी म्हणून थेट जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले परंतु हे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देऊन गेली १३ ते १४ दिवस झाली जिल्हाधिकाऱ्याकडून कसलेच उत्तर मिळाले नाही.
दरम्यान याबाबत दिलेल्या प्रसिद्धी पत्रकार रमेश उबाळे यांनी म्हटले आहे, कोणत्यातरी कॉन्ट्रॅक्टरने फिरवली जादूची कांडी फिरवली की काय?
कॉंक्रिटचा रस्ता व बंदिस्त गटारे करून कॉन्ट्रॅक्टर झाला मिस्टर इंडिया गायब झाला आहे. ना कोणता बोर्ड ?ना कोणता गाजावाजा? ना शासकीय अधिकारी? ना शासकीय निधी ?ना लोकप्रतिनिधी? ना उद्घाटन? ना नारळ? ना टिकाव?
ग्रामस्थांनासुद्धा काहीच माहित नाही...! ग्रामपंचायतीला माहित नाही...! गावात कुणालाच काही ठावठिकाणा नाही...!
या सर्व नाट्यमय घडामोडी मागे नेमका हात कोणाचा ? कोणाच्या वरदहस्तामुळे झाली ही जादू ? कोण पालक व कोण मालक? शासकिय अधिकारी पण खिशात घेऊन फिरतोय कोण? कोणाचा आहे सहभाग? कोणाची हिस्से वारी आणि टक्केवारी? कोणाचे हात माखले भ्रष्टाचारात ? कोण घेणार जवाबदारी? अशा असंख्य प्रश्नांमध्ये गोल गोल फिरतंय, डोकं,,, गरगरतय ...डोकं ग्रामस्थ ग्रामपंचायत, पदाधिकाऱ्यांची...! कोण देणार उत्तर ? कोण सांभाळणार हे दप्तर? ही जादू आहे की काय? असा उपरोधिक टोलाही त्यांनी प्रशसनाला मारला असून याबाबत योग्य ती चौकशी व्हावी अन्यथा आपणास आंदोलन करावे लागेल, असा इशाराही उबाळे यांनी दिला आहे.
वास्तविक रस्ता कॉंक्रिटीकरण व बंदिस्त गटरच्या झालेल्या काम हे मोठ्या रक्कमेचे असून यासाठी ई टेंडर काढून, जाहीर निविदा प्रसिद्ध करून टेंडर मागविणे आवश्यक होते परंतु असे काही घडलेच नसावे या कामाबाबत योग्य प्रोसिस केली असेल तर प्रशसनाने आपणास माहिती द्यावी असेही त्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


