maharashtra

सातारा जिल्हा बँकेच्या सेवानिवृत्त सेवकांस सेवानिवृत्तीच्या दिवशीच पेन्शनचा लाभ !


Retired employees of Satara District Bank get pension benefit on the day of retirement!
जिल्हयातील सर्वसामान्यांचे आणि शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सदैव कार्यरत असलेली व उत्कृष्ठ आर्थिक नियोजनातून सक्षम असणारी माझी बँक, आपली हक्काची बॅंक म्हणून सातारा जिल्हा बॅंकेकडे पाहिले जाते.

सातारा : जिल्हयातील सर्वसामान्यांचे आणि शेतक-यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सदैव कार्यरत असलेली व उत्कृष्ठ आर्थिक नियोजनातून सक्षम असणारी माझी बँक, आपली हक्काची बॅंक म्हणून सातारा जिल्हा बॅंकेकडे पाहिले जाते. व्यापारी व सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये आधुनिकतेचे वारे वाहू लागले असून जिल्हा बँकेनेही उच्च दर्जाच्या आधुनिक तंत्रप्रणालीचा वापर सुरु केला आहे. बँकिंग व्यवसायामध्ये बँकेचे कर्मचारी ग्राहकाना अविरतपणे व प्रामाणिकपणे बँकिंग सेवा देण्याचे काम करीत असतात.  बँक सेवानिवृत्त सेवकांना व अधिकाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी कोल्हापूर यांचे मार्फत सेवानिवृत्तीस मिळणारे आर्थिक लाभ तसेच पेन्शन तत्काळ किंबहुना सेवानिवृत्तीचे तारखे दिवशीच त्यांचे कुटुंबीयांच्या भविष्याच्या दृष्टीने पेन्शनचा लाभ मिळवून देणेकरीता बँकेचे मा. संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, सरव्यवस्थापक राजीव गाढवे, राजेंद्र भिलारे यांनी विशेष प्रयत्न करून सेवानिवृत्तीचे तारखे दिवशीच आर्थिक लाभ देणेची अंमलबजावणी केली आहे.
बँकेचे सेवक संजय हेंद्रे बँक नोकरी नियमानुसार वयाचे ५८ व्या वर्षी दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले असून त्याच दिवशी त्यांना पेन्शन व इतर आर्थिक लाभ देणेत आले आहेत. हेंद्रे यांना मा. आयुक्त, भविष्य निर्वाह निधी कार्यालय, कोल्हापूर यांच्या हस्ते पेन्शन रक्कमेचा धनादेश देनेत आला.
संचालक व सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, जिल्हा बॅंकेतील अधिकारी व कर्मचारी यांची ओळख सौजन्यशिल व सेवाभावी वृत्तीने सतत अविरत कामकाज करणारा अशी आहे. सर्वसामान्यांना आणि शेतकऱ्यांना मदत करणारी हक्काची बँक म्हणून सातारा जिल्हा बॅंकेकडे पाहिले जाते. सेवानिवृत्ती नंतर अधिकारी व कर्मचारी यांना हक्काचे सर्व लाभ वेळेत मिळणे ही बाब त्याच्या कुटुंबास आर्थिक व मानसिक बळ देणारी असून सेवकांनी बँकेच्या प्रगतीसाठी अधिक जोमाने कामकाज करणेच्या भावना व्यक्त केल्या.
 अध्यक्ष श्री. नितीन पाटील म्हणाले, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक ही ग्रामीण भागातील तळागाळातील शेतकरी सभासदांपर्यंत पोहोचली असून जिल्हयामध्ये ३२० शाखा व ६२ एटीएमच्या माध्यमातून ग्राहकांना अत्याधुनिक विविध प्रकारच्या सेवा देत आहे. बँक आज तळमळीने व निष्ठेने ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचली असून विविध प्रकारे बँक सामाजिक बांधिलकी जपत असलेचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, सातारा जिल्हा हा क्रांतीकारकांचा जिल्हा असून या जिल्हयाचे नांव देशामध्ये अग्रक्रमाने घेतले जाते. याच बरोबर सर्व सेवकांच्या योगदानातून व बँकेच्या मा .संचालक मंडळाचे सुयोग्य धोरण व भविष्यातील नियोजनामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा नावलौकीक देशभर असून बँकिग कामकाजाबरोबर सामाजिक बांधिलकी जपत विकासाभिमुख केलेले कामकाज हे देशातील सहकारी बँकांसाठी आदर्शवत असलेचे प्रतिपादन त्यांनी केले.
या प्रसंगी हेंद्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करून बँकेच्या मा. संचालक मंडळ व अधिकारी यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.