सातारा जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जण बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : सातारा जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जण बेपत्ता झाल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २६ एप्रिल रोजी नऊ वाजण्याच्या सुमारास म्हसवड, ता. माण येथून राहत्या घरातून अब्दुल रज्जाक आदमभाई चोपदार, वय ६० हे राहत्या घरातून निघून गेले ते अद्याप परत न आल्याची तक्रार सलाउद्दीन चोपदार यांनी म्हसवड पोलीस ठाण्यात दिली आहे. दुसऱ्या घटनेत दि. २७ एप्रिल रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास नेले, (किडगाव) ता. सातारा येथून कल्याणी संतोष पवार ही महिला दवाखान्यात जाते असे सांगून घरातून निघून गेली ती अद्याप परत न आल्याची तक्रार संतोष कुंडलिक पवार यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.
तिसऱ्या घटनेत दि. २६ एप्रिल रोजी सहा वाजण्याच्या सुमारास शिरवळ, ता. खंडाळा गावच्या हद्दीत असणार्या एका मंगल कार्यालयाच्या शेजारून रोहित सुरेश जाधव, वय २६, मूळ रा. खराडे, ता. कराड हा कंपनीत कामात जातो असे सांगून गेला तो परत न आल्याची तक्रार सुवर्णा सुरेश जाधव यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात दिली आहे.


