न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी समीर विनोद देखणे, रा. वाढे, ता. सातारा त्याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी समीर विनोद देखणे, रा. वाढे, ता. सातारा त्याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ एप्रिल रोजी बारा वाजण्याच्या सुमारास सातारा न्यायालयाचे दुसरे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी एका केस संदर्भात दिलेल्या तारखेस उपस्थित राहिला नाही. त्यानंतर न्यायालयाने त्याला काढलेल्या नॉन बेलेबल वॉरंटीच्या बजावणी वेळी तो मिळून न आल्याने न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याच्याविरोधात पोलीस हवालदार प्रकाश व्यंकटराव माने यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला. दरम्यान अशाच प्रकारचा गुन्हा मिलिंद शामराव देखणे, रा. वाढे, ता. सातारा याच्या विरोधात दाखल झाला आहे.


