महाराष्ट्र

esahas.com
महाराष्ट्र

लग्नाच्या आमिषाने महिलेवर सातारा शहर परिसरात अत्याचार

लग्नाच्या आमिषाने गोरेगाव, पश्चिम मुंबई येथील एका महिलेवर सातारा शहर परिसरात एकाने अत्याचार केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

जीवे मारण्याची धमकी देऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एका अल्पवयीन मुलीला व तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

करंजे येथे गळफास लावून एकाची आत्महत्या

करंजे तर्फ सातारा येथे एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

esahas.com
महाराष्ट्र

शिवीगाळ, दमदाटी व मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

नातवाने गेट वाजवण्याचा कारणावरून एका महिलेसह तिच्या घरातील सदस्यांना मारहाण केल्याप्रकरणी अफझल शिकलगार, रा. गोकर्ण नगर, संगमनगर, सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

कृष्णा नदीत पोहण्यासाठी गेलेला युवक बुडाला

ओझर्डे, ता. वाई येथील कृष्णा नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेला शिरगावमधील वेदांत वसंत चव्हाण, वय १६ हा युवक बुडल्याची घटना रविवारी घडली. या घटनेनंतर सायंकाळी उशिरापर्यत महाबळेश्वर ट्रेकर्सकडून नदीपात्रात युवकाचा शोध घेतला जात होता. मात्र, काहीच हाती आले नसल्याने सायंकाळी उशिरा शोध मोहीम थांबवण्यात आली.

esahas.com
महाराष्ट्र

सातारा तालुक्यासह शहर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ

सातारा तालुक्यासह शहर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून तीन वेगवेगळ्या परिसरातील घटनांमध्ये सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे.

esahas.com
महाराष्ट्र

आईच्या निधनानंतर चिमुकलीने घेतली कुटुंबाची जबाबदारी, पण मद्यपी वडिलांच्या त्रासाला कंटाळून संपवले जीवन

आईच्या निधनानंतर लहान वयातच १५ वर्षांच्या मुलीने कुटुंबाची जबाबदारी स्वत:च्या अंगावर घेतली. मात्र, वडील सतत दारू पिऊन तरर्र असल्याने मुलगी वडिलांच्या त्रासाला कंटाळली. त्यामुळे तिने यातून सुटका व्हावी म्हणून विहिरीत उडी टाकून आपले आयुष्य संपविले. मानसी संतोष डाडर (वय १५, मूळ रा. नागलवाडी, ता. कर्जत, जि. अहमदनगर, सध्या रा. आंबेवाडी, ता. सातारा) असे या मृत मुलीचे नाव आहे. ही हृदयद्रावक घटना सातारा तालुक्यातील आंबेवाडी येथे घडलीय.

esahas.com
महाराष्ट्र

आ. जयकुमार गोरे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार : महेश तपासे

भाजपचे आ. जयकुमार गोरे यांनी मयत व्यक्तीच्या बोगस दाखल्याचा आधार घेऊन जमीन हडपण्याचा केलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. आ. जयकुमार गोरे यांना तत्काळ अटक करण्यात यावी यासाठी पोलीस अधीक्षक अजय बन्सलं यांना भेटणार आहे. याशिवाय गोरे यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी राज्यपालांकडे करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत केली.

esahas.com
महाराष्ट्र

विकास कामांमध्ये अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा मुलाहिजा ठेवणार नाही

सातारा जिल्ह्यातील विकास कामे आम्ही लोकांच्या मागणीनुसार आणि आवश्यकतेनुसार सुचवित असतो. या कामांची अनावश्‍यक अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांचा बिलकुल मुलाहिजा ठेवला जाणार नाही. लोकांच्या हितासाठी असणारी विकास कामे वेळेत मार्गी लागायला हवीत, अशा स्पष्ट कानपिचक्या खासदार उदयनराजे भोसले यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

esahas.com
महाराष्ट्र

आ. गोरे जामीन अर्ज सुनावणी वडूज न्यायालयातच होणार, जिल्हा न्यायालयाने अर्ज फेटाळला

मायणी (ता. खटाव) येथे मागासवर्गीय मृत व्यक्तीची बनावट सही व कागदपत्रे तयार करून जमिनीचा करार केल्याच्या गुन्ह्यात दहिवडी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. त्याबाबत अटकपूर्व जामीन अर्ज वडूज न्यायालयाऐवजी अन्य न्यायालयात चालवण्यासाठी भाजपचे आ. जयकुमार गोरे यांच्यावतीने सातारा जिल्हा न्यायालयात अर्ज करण्यात आला होता. तो फेटाळला आहे. आता जामिनाबाबत वडूज न्यायालयातच सुनावणी होणार आहे.