सातारा तालुक्यासह शहर परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ
तीन वेगवेगळ्या परिसरातील घटनांमध्ये सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज लंपास
सातारा तालुक्यासह शहर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून तीन वेगवेगळ्या परिसरातील घटनांमध्ये सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
सातारा : सातारा तालुक्यासह शहर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून तीन वेगवेगळ्या परिसरातील घटनांमध्ये सुमारे साडेपाच लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 1 मे रोजी अडीच ते चार वाजण्याच्या दरम्यान सदरबझार येथील उज्वल ब्यूटी पार्लरमध्ये कपड्यांच्या खाली ठेवलेल्या पर्समधून अज्ञात चोरट्याने 65 हजार रुपये किमतीचे एक मंगळसूत्र, 2 हजार रुपये किमतीचे कर्णफुले, 2 हजार रुपये किमतीचे कानातील सोन्याचे वेल, 1 हजार रुपये किमतीचे चांदीचे पैंजण आणि 700 रुपये रोख असे एकूण 71 हजार 700 रुपयांचे दागिने लंपास केल्याची तक्रार सौ उज्वला किशोर गाडे, रा. कोंडवे, ता. सातारा यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.
दुसर्या घटनेत, दि. 30 रोजी 4 वाजण्याच्या सुमारास सहजीवन हाउसिंग सोसायटी, विलासपूर, शिवाजी चौक, सातारा एका घराच्या बेडरूममध्ये असणार्या खिडकीचे गज कापून त्याने घरातील 59 हजार 500 रुपयांची रोख रक्कम 12 हजार 500 रुपये किमतीच्या चार अंगठ्या, 8 हजार रुपये किमतीच्या तीन चांदीच्या अंगठ्या चोरून नेल्याची तक्रार ताजुद्दीन तांबोळी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल केली.
तिसर्या घटनेत, दि. 1 मे रोजी साडे पाच वाजण्याच्या सुमारास मालगाव, ता. सातारा येथील विठ्ठल संभाजी हबाळ, वय 48 यांच्या बंद घरात प्रवेश करून चोरट्यांनी 38 हजार 600 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, 58 हजार 800 रुपये किमतीची सोन्याची चैन, 50 हजार 400 रुपये किमतीचा सोन्याचा बदाम, 63 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 84 हजार रुपये किमतीचे नेकलेस, 2 हजार किमतीचा मोबाइल चोरून नेल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. घटनास्थळी कोरेगाव चे उपविभागीय पोलिस अधिकारी किद्रे यांनी भेट दिली असून चोरट्यांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


