येथील महावितरणमध्ये कार्यरत असलेले अधिकारी यांचे बंद फ्लॅटचे कुलुप तोडून एकुण अंदाजे तीन लाख ८१ हजार ५९४ रुपयाचे अंदाजे १० तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले, तर याचबरोबर येथील मंडई कॉलनी व पवारवस्ती येथेही बंद फ्लॅट मधील कुलूप तोडून चोरी केल्याची घटना घडली मात्र यातील किती मुद्देमाल गेला? याची माहिती घेण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालु होते. एकाच दिवशी तीन बंद फ्लॅट फोडुन चोरट्यांनी भरदिवसा शिरवळ मध्ये धुमाकुळ घातल्याची घटना घडली.
वडगाव हवेली (ता. कराड) येथील पती-पत्नीसह चिमुकलीचा भुवनेश्वर, ओरीसा येथे मृत्यू झाल्याची घटना तीन दिवसांपुर्वी घडली. संबंधितांचे मृतदेह गावी आणल्यानंतर ते ताब्यात घेण्यास नातेवाईकांनी नकार दिला. घातपात झाल्याचा आरोप करत नातेवाईकांसह जमावाने शुक्रवार दि. 29 रोजी रात्री मृतदेहांसह रुग्णवाहिका कराड तालुका पोलीस ठाण्यात आणून तेथेच ठिय्या मांडला. यावेळी जमाव आक्रमक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
शिरवडे ता. कराड येथे पोहण्यासाठी गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ओंकार दत्तात्रय माने (वय १४) त्याचे नाव आहे. ओंकार ज्योतिर्लिंग विद्यालयात सहावीच्या वर्गात शिकत होता. ओंकार मित्रांसोबत पोहण्यास गेला होता. त्याच्या निधनाची बातमी समजताच शिरवडे गावावर शोककळा पसरली.
उन्हात दोन मिनिटे उभे राहिले तर माणसाचा जीव कासावीस होतो. अशा वेळी शिवारात वणवा लावून अनेक जीवजँतु व सरपटणाऱ्या प्राण्यांचा बळी जात आहे. त्यामुळे वणवा लावणाऱ्यावर वन विभागाने कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. चार दिवसांपूर्वी वाशिवली व किरुंडे येथे वणवा लावल्या प्रकरणी वाई वन विभागाने दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
कराड तालुक्यातील एक खळबळ घटना समोर आलेली आहे. स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा आई- वडिलांनीच खून केल्याची घटना समोर आलेली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी आई- वडिलांना कराड तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुलीचा प्रेमप्रकरणातून हा खून केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून मिळालेली आहे. तब्बल 14 दिवसांनी पुरलेला मुलीचा मृतदेह रविवार दि. 1 मे रोजी ताब्यात घेण्यात आला.
शासकीय पातळीवर चांगल्या व प्रामाणिक अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने जनतेची सेवा केली आहे. त्यांचे आजही नाव काढले जाते. परंतु, भ्रष्टाचार हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे समजणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्णेसह इतर निकृष्ट दर्जाच्या रत्याबाबत पुनर्बांधणी करण्याची नामुष्की ओढवून घेतली आहे. या अधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करावे अन्यथा एक दिवस पश्चताप सहन करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रासह विविध राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या प.पू. सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समधीस ७४ वर्ष पूर्ण झाली आहेत. येणारा रथोत्सव ७५ वा असून गुरुवार दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी आहे. त्यामुळे या अमृतमहोत्सवी रथोत्सवापूर्वी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज आणि भक्तांच्या संकल्पनेतून श्री महाराजांचा "ॐ नमो श्री सेवागिरी नाथाय नमः" या मंत्राचा ७५ कोटी नाम जप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
गेली चोवीस वर्षे अव्याहतपणे गुलमोहराचे सौंदर्य साताऱ्यातील लोकांना समजवणारा गुलमोहर डे महाराष्ट्र दिनी काव्यवाचन, चित्रकाम तसेच गुलमोहराच्या विविध सजावटीच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. गुलमोहर ग्रुपच्या परिवारातील सदस्यांनी तसेच रंगकर्मी छायाचित्रकार यांनी रंगोत्सवाला उत्साहात हजेरी लावली.
मराठा साम्राज्याच्या इतिहासात महाराणी येसूबाई हे त्याग आणि संयम याचे मूर्तीमंत उदाहरण आहे. मातृत्व आणि कर्तुत्व यांचा मनोहारी संगम असणाऱ्या लढवय्या महाराणी येसूबाई यांनी इतिहासामध्ये त्यांच्य धीरोदात्त स्वभावाचे दर्शन घडवले. मात्र इतिहासाने त्यांच्या कर्तृत्वाची म्हणावी तशी दखल घेतली नाही हे व्यक्तिमत्त्व समजून घेण्यात आपणच कुठेतरी कमी पडलो, असे प्रतिपादन सोलापूर ग्रामीण च्या पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.
ज्या मुलाला आयुष्यभर संभाळले त्या पोटच्या मुलाने स्वतःच्याच वृध्द पित्याचा कुऱ्हाडीने घाव घालून खून केला. या घटनेने माण तालुक्यात खळबळ माजली आहे. पांडुरंग बाबुराव सस्ते (वय ७०) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.