maharashtra

७५ कोटी "ॐ नमो श्री सेवागिरी नाथाय नमः" नाम जप करण्याचा संकल्प


75 crore
महाराष्ट्रासह विविध राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या प.पू. सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समधीस ७४ वर्ष पूर्ण झाली आहेत. येणारा रथोत्सव ७५ वा असून गुरुवार दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी आहे. त्यामुळे या अमृतमहोत्सवी रथोत्सवापूर्वी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज आणि भक्तांच्या संकल्पनेतून श्री महाराजांचा "ॐ नमो श्री सेवागिरी नाथाय नमः"  या मंत्राचा ७५ कोटी नाम जप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

पुसेगाव : महाराष्ट्रासह विविध राज्यातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या प.पू. सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समधीस ७४ वर्ष पूर्ण झाली आहेत. येणारा रथोत्सव ७५ वा असून गुरुवार दि. २२ डिसेंबर २०२२ रोजी आहे. त्यामुळे या अमृतमहोत्सवी रथोत्सवापूर्वी देवस्थान ट्रस्टचे मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज आणि भक्तांच्या संकल्पनेतून श्री महाराजांचा "ॐ नमो श्री सेवागिरी नाथाय नमः"  या मंत्राचा ७५ कोटी नाम जप करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
सदरच्या संकल्पाचा शुभारंभ शनिवारपासून (ता. ३०) सुरू करण्यात आला आहे. याविषयी अधिक माहिती देताना मठाधिपती सुंदरगिरी महाराज म्हणाले, सेवागिरी महाराजांचे भक्तगण या संकल्पात आपल्या घरून किंवा बाहेर गावावरून देखील सहभागी होऊ शकतात. ज्या भाविक, भक्त, ग्रामस्थांना श्री सेवागिरी महाराजांच्या मंदिरात येऊन नाम जप करणे शक्य आहे त्यांनी मंदिरात येऊन सहभाग नोंदवावा. तर ज्यांना शक्य नसेल अशांनी घरी बसून हा जप केला तरी चालेल. भाविकांनी नातेवाईक, मित्रमंडळी यांना देखील हा जप करण्यास प्रवृत्त करावे.
या मध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी आपली नाम जप संख्या, आपले नाव, गाव देवस्थान ट्रस्टच्या कार्यालयात समक्ष अथवा ९१४२२६०३४७ या क्रमांकावर कॉल, एस. एम. एस. किंवा व्हाट्सअप मेसेज करून कळवावी. त्याची नोंद देवस्थान ट्रस्ट ठेवणार आहे. तसेच या नाम जप यज्ञात सहभागी होणाऱ्या भक्तांना संकल्प पूर्तीच्या कार्यक्रमाला विशेष आमंत्रित करण्यात येणार आहे. तरी सर्व भाविक-भक्तांनी आणि ग्रामस्थांनी या श्री सेवागिरी महाराजांच्या नाम जप यज्ञात सहभागी व्हावे, असे आवाहन मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज यांनी केले आहे. यावेळी चेअरमन मोहनराव जाधव, विश्वस्त योगेश देशमुख व ग्रामस्थ उपस्थित होते.