maharashtra

वर्णेसह इतर निकृष्ट रस्त्याच्या पुनर्बांधणीचे अधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करावे


Officials should reconsider the reconstruction of other inferior roads including Varna
शासकीय पातळीवर चांगल्या व प्रामाणिक अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने जनतेची सेवा केली आहे. त्यांचे आजही नाव काढले जाते. परंतु, भ्रष्टाचार हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे समजणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्णेसह इतर निकृष्ट दर्जाच्या रत्याबाबत पुनर्बांधणी करण्याची नामुष्की ओढवून घेतली आहे. या अधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करावे अन्यथा एक दिवस पश्चताप सहन करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.

पुसेगाव : शासकीय पातळीवर चांगल्या व प्रामाणिक अधिकाऱ्यांनी खऱ्या अर्थाने जनतेची सेवा केली आहे. त्यांचे आजही नाव काढले जाते. परंतु, भ्रष्टाचार हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, असे समजणाऱ्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्णेसह इतर निकृष्ट दर्जाच्या रत्याबाबत पुनर्बांधणी करण्याची नामुष्की ओढवून घेतली आहे. या अधिकाऱ्यांनी आत्मचिंतन करावे अन्यथा एक दिवस पश्चताप सहन करावा लागेल, असा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या काही दिवसात कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विकासकामांच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे रस्ते व पुराव्यासह तक्रार दाखल केली होती. त्याबाबत भ्रष्ट अधिकारी व ठेकेदार यांनी दुर्लक्ष केले होते. अखेर काही प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमा असलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रसार माध्यमांनी निस्वार्थी पणे आवाज उठवला होता. स्थानिक लोकांनी ही साथ दिली. त्यामुळे पुन्हा रस्त्याचे काम सुरू करावे लागले आहे. हे काम का सुरू केले? याचे गुपित सर्वांनाच माहिती पडले आहे. बोरखळ, वर्णे व इतर अनेक गावातून एक चळवळ म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते रमेश अनिल उबाळे यांच्याकडे लेखी व तोंडी तक्रारी येत आहेत. जे काम सातवा आयोग घेणाऱ्या बांधकाम विभाग, गुणवत्ता नियंत्रक विभागाचे आहे. ते काम सामाजिक भावनेतून कार्यकर्त्यांना करावे लागले आहे.यापुढे ग्रामस्थांनी गावच्या विकासासाठी अशा कामांच्या सुरुवातीलाच खबरदारी घ्यावी असे सूचित करण्यात येत आहे.
ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम सिध्द झाल्यानंतर पुन्हा तेच काम करण्याची नामुष्की ओढवली आहे. अशा रस्त्यालगत संबधित ठेकेदार व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे नाव व संपर्क नंबर दर्शनी फलकावर लिहण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी विविध गावातील प्रामाणिक व स्वच्छ प्रतिमा असलेल्या कार्यकर्त्यानी केली आहे. ही एक परिवर्तनवादी क्रांती घडवून आणली गेली आहे. अशी चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, व्यक्तिगत पातळीवर कोणाशी वैर नाही. जे काम ठराविक मार्जिन राखून केले तर विरोध असण्याचे कारण नाही, परंतु, साठ टक्के काम व चाळीस टक्के वाटप हे थांबले पाहिजे. हेच माझ्या आंदोलनाची भूमिका आहे. ती पुढे ही सुरूच राहील असा निर्धार युवा नेते रमेश अनिल उबाळे यांनी सातारा जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना केला आहे. या आंदोलनात स्थानिक ग्रामस्थ, प्रसार माध्यमे व प्रामाणिक अधिकाऱ्यांनी सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही आभार मानले आहेत.