उन्हात दोन मिनिटे उभे राहिले तर माणसाचा जीव कासावीस होतो. अशा वेळी शिवारात वणवा लावून अनेक जीवजँतु व सरपटणाऱ्या प्राण्यांचा बळी जात आहे. त्यामुळे वणवा लावणाऱ्यावर वन विभागाने कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. चार दिवसांपूर्वी वाशिवली व किरुंडे येथे वणवा लावल्या प्रकरणी वाई वन विभागाने दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
सातारा : उन्हात दोन मिनिटे उभे राहिले तर माणसाचा जीव कासावीस होतो. अशा वेळी शिवारात वणवा लावून अनेक जीवजँतु व सरपटणाऱ्या प्राण्यांचा बळी जात आहे. त्यामुळे वणवा लावणाऱ्यावर वन विभागाने कडक कारवाई करण्याची भूमिका घेतली आहे. चार दिवसांपूर्वी वाशिवली व किरुंडे येथे वणवा लावल्या प्रकरणी वाई वन विभागाने दोघांवर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत माहिती अशी की, वाई तालुक्यातील वाशिवली व किरुंडे या दोन्ही ठिकाणच्या शिवारात वणवा लावण्यात आला होता. सदरची माहिती समजताच वाई वनपरिक्षेत्रातील रामेश्वर भोपळे वनरक्षक, वडवली व संजय चव्हाण कायम वनमजुर वाई व हंगामी वनमजुर यांनी जागेवर पोहचून मोठ्या शिताफीने लागलेला वणवा विझवला व तद्नंतर सदर दोन्ही ठिकाणी चौकशी करून हा वणवा कोणी लावला? याबाबद्दल अधिक माहिती केली असता दोन्ही ठिकाणी भातचे तरवा तयार करणेसाठी राब जाळताना सदरची आग लावली होती. परंतु, वाऱ्यामुळे ही आग आटोक्यात न आलेने परिसरात वणवा वाढला व त्यामुळं वनक्षेत्र तसेच मालकी क्षेत्र जळाले असल्याचे निदर्शनास आले. सदरचा वणवा किरुंडे येथे श्रीपती पांडुरंग ढवळे यांनी व वाशिवली येथे नर्मदा शिवराम वाशिवले यांनी लावला होता. सदर दोघांवर गुन्हा केला असून त्यांनी भाताच्या शेतात आग लावल्याचा व त्यामुळे वणवा पेटल्याचे कबूल केला आहे. त्यांचेवर भारतीय वन अधिनियम१९२७ अंतर्गत गुन्हा दाखल करणेत आला आहे.
सदरची कारवाई उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहायक वनसंरक्षक सुधीर सोनावले, वाई वनपरिक्षेत्र अधिकारी स्नेहल मगर, सावता लोखंडे, यांचे मार्गदर्शनाखाली पार पडली वनव्यामुळे जैव विविधतेचे नुकसान होत असून लोकांना वनविभागमार्फत राब जाळताना काळजी घेणेबाबत नोटीस देऊनही वणवा लागत आहे तरीही लोकांनी योग्य ती काळजी घेऊन वणवा लागू नये याबाबत सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तरीही वणवा लावल्याचे निदर्शनास आले तर आणखी कडक कारवाई करण्यात येणार आहे.


