maharashtra

लग्नाच्या आमिषाने महिलेवर सातारा शहर परिसरात अत्याचार


Atrocities on women in Satara city area in the lure of marriage
लग्नाच्या आमिषाने गोरेगाव, पश्चिम मुंबई येथील एका महिलेवर सातारा शहर परिसरात एकाने अत्याचार केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : लग्नाच्या आमिषाने गोरेगाव, पश्चिम मुंबई येथील एका महिलेवर सातारा शहर परिसरात एकाने अत्याचार केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. २७ जानेवारी २०२१ ते दि. २९  जानेवारी २०२१ गोरेगाव पश्चिम मुंबई तेथे वास्तव्य करणाऱ्या एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून विकास शामराव जाधव, वय २८,  निसर्ग कॉम्प्लेक्स गावडे पेट्रोल पंपाजवळ, गुनावडी रोड, तालुका बारामती याने सातारा येथील केबीपी महाविद्यालयाच्या जवळ असणाऱ्या हॉटेलवर, सातारा बसस्थानक जवळ आणि कास पठार जवळ असणाऱ्या एका रिसॉर्टवर अत्याचार केला. त्याच्याकडे लग्नाबाबत विचारपूस केली असता त्याने लग्नास नकार देऊन तुला काय करायच आहे ते कर अशी धमकी दिल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.