नातवाने गेट वाजवण्याचा कारणावरून एका महिलेसह तिच्या घरातील सदस्यांना मारहाण केल्याप्रकरणी अफझल शिकलगार, रा. गोकर्ण नगर, संगमनगर, सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सातारा : नातवाने गेट वाजवण्याचा कारणावरून एका महिलेसह तिच्या घरातील सदस्यांना मारहाण केल्याप्रकरणी अफझल शिकलगार, रा. गोकर्ण नगर, संगमनगर, सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३० एप्रिल रोजी दीड वाजण्याच्या सुमारास गोकर्ण नगर, संगमनगर येथे संगिता सोपान क्षीरसागर, यांचा नातू आदित्य हा खेळत, खेळत अफझल शिकलगार यांच्या गेट समोर जाऊन त्याने गेट वाजवण्याचा कारणावरून शिकलगार याने संगीता क्षीरसागर व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात लागू झाली आहे.


