एका अल्पवयीन मुलीला व तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा : एका अल्पवयीन मुलीला व तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची धमकी देऊन तिचा विनयभंग केल्याची तक्रार सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ३० रोजी सातारा शहर परिसरातील एका फ्लॅटमध्ये शुभम ज्योतिराम पिसाळ, वय २५, रा. पाडळी निनाम, ता. सातारा याने एका अल्पवयीन मुलीला तू माझ्यासोबत लग्न केले नाहीस तर तुला व तुझ्या आई-वडिलांना जिवे मारून टाकीन अशी धमकी देऊन तिचा विनयभंग केला. याबाबत त्या अल्पवयीन मुलीच्या पालकांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


