सातारा जिल्ह्यातून तीन वेगवेगळ्या ठिकाणाहून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्याची तक्रार संबंधित पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे.
सातारा जिल्हा पोलिसांनी गेल्या पंधरा दिवसांमध्ये 353 केसेस मध्ये तब्बल 501 आरोपींवर कारवाई करून दोन कोटी 44 लाख 41 हजार 327 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे.
वन्यजीव संरक्षण सूची च्या दुसऱ्या विभागात नोंद असलेल्या नाग या वन्य प्राण्या बरोबर व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड करण्याचा प्रकार ओगलेवाडी येथील एका तरुणाच्या चांगलाच अंगलट आला आहे. या प्रकरणी ओमकार रामचंद्र साळुंखे (वय 19, राहणार ओगलेवाडी, तालुका कराड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दलित मागासवर्गीय समाजाच्या हितासाठी स्टॅन्डअप इंडिया ही योजना पंतप्रधानांनी अंमलात आणली. संबंधित योजना राबवण्यासाठी प्रत्येक बँकेला शासकीय परिपत्रकानुसार प्रत्येक वर्षी किमान ३ कर्जवाटप करण्याचा आदेशही देण्यात आला. मात्र तांत्रिक अडचणी दाखवून खाजगी बँका उद्योजकांना कर्ज मिळवून देत नसल्याच्या विरोधात युवा उद्योजक शेखर कांबळे यांनी तिसऱ्यांदा उपोषण सुरू केले आहे.
भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी शुक्रवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर उत्स्फूर्त भेट घेतली. यावेळी उभयतांमध्ये वेगवेगळ्या राजकीय विषयांवर चर्चा झाली. या भेटीचे राजकीय वर्तुळामध्ये चांगलेच पडसाद उमटले आहेत. या भेटीमध्ये उदयनराजे यांनी फडणवीस यांच्या कुशल रणनीतीबद्दल पुष्पगुच्छ देऊन विशेष अभिनंदन केले.
आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोई-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने 'आषाढी वारी 2022' ॲप विकसित करण्यात आले आहे.
निढळ येथील हनुमान विद्यालय च्या एस एस सी परीक्षेत शाळेचा निकाल 100 टक्के लागला.
विद्यार्थी वर्गाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर निवडावे. आपला कल पाहून शाखा निवडावी. केवळ आपल्या जवळच्या मित्राने एखादी शाखा निवडली म्हणून आपण ती शाखा निवडू नये. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. करीअर च्या अनेक वाटा आहेत. आपल्याला जी योग्य वाटते ती वाट आपण निवडावी.
सातारा-लोणंद मार्गावर असणार्या वाढे फाटा येथील ‘हॉटेल जांभळे बंधू’च्या मालकावर कारवाई करण्यात येवून हे अतिक्रमण तातडीने हटविण्यात यावे, अशी मागणी आम आदमी पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगावकर यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकार्यांकडे केली आहे.
जम्मू काश्मीरच्या लेहमध्ये साताऱ्याचे जवान सुरज शेळके यांना वीरमरण आलं आहे. लष्कराचं ऑपरेशन रक्षक सुरु असताना जवान सुरज शेळके शहीद झाले आहेत. सुरज शेळके हे साताऱ्यातील खटाव गावचे सुपूत्र आहेत. जवान सुरज शेळके यांच्या जाण्यानं खटावमध्ये शोककळा पसरली आहे.