नागा सोबतचा व्हिडिओ अपलोड करणे आले अंगलट
ओगलेवाडीच्या ओंकार साळुंखे याच्यावर गुन्हा दाखल
वन्यजीव संरक्षण सूची च्या दुसऱ्या विभागात नोंद असलेल्या नाग या वन्य प्राण्या बरोबर व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड करण्याचा प्रकार ओगलेवाडी येथील एका तरुणाच्या चांगलाच अंगलट आला आहे. या प्रकरणी ओमकार रामचंद्र साळुंखे (वय 19, राहणार ओगलेवाडी, तालुका कराड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : वन्यजीव संरक्षण सूची च्या दुसऱ्या विभागात नोंद असलेल्या नाग या वन्य प्राण्या बरोबर व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर अपलोड करण्याचा प्रकार ओगलेवाडी येथील एका तरुणाच्या चांगलाच अंगलट आला आहे. या प्रकरणी ओमकार रामचंद्र साळुंखे (वय 19, राहणार ओगलेवाडी, तालुका कराड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भातील अधिक माहिती अशी, कराड परिक्षेत्राचे वनाधिकारी टी. डी. नवले यांना मिळालेल्या माहितीवरून एक इसम नागासमवेत खेळ करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे या माहितीची नवले यांनी सत्यता पडताळणी केली असता ओंकार साळुंखे याने मीडियावरील इंस्टाग्राम ॲप वर नाग पकडून त्याच्या सोबतचा व्हिडिओ तयार केला होता. हा इसम ओगले वाडी येथील असल्याचे समजल्यावर ओंकार साळुंखे याला त्याच्या घरातून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले.
नाग हा वन्यजीव संरक्षण सूचीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून त्याला संरक्षण देण्यात आले आहे. वन्य प्राण्यासोबत व्हिडिओ तयार करणे व सोशल मीडियावर त्याचा प्रसार करणे हा प्रकार वन्य जीव संरक्षण अधिनियम 1972 च्या तीन प्रमाणे गुन्हा आहे. या गुन्ह्याची नोंद कराड तालुका पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली तुषार नवले वनक्षेत्रपाल कराड, वनपाल बाबुराव कदम मलकापूर, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, वनकर्मचारी रमेश जाधवर, सचिन खंडागळे, भारत खटावकर यांनी या कारवाईत भाग घेतला.


