maharashtra

दलितांवरील अन्यायाच्या विरोधात तिसऱ्यांदा उपोषण

भीमशक्ती आंदोलनाच्या माध्यमातून लढा : स्टँडअप इंडिया योजनेबाबत होतेय फसवणूक

Fasting for the third time against injustice against Dalits
दलित मागासवर्गीय समाजाच्या हितासाठी स्टॅन्डअप इंडिया ही योजना पंतप्रधानांनी अंमलात आणली. संबंधित योजना राबवण्यासाठी प्रत्येक बँकेला शासकीय परिपत्रकानुसार प्रत्येक वर्षी किमान ३ कर्जवाटप करण्याचा आदेशही देण्यात आला. मात्र तांत्रिक अडचणी दाखवून खाजगी बँका उद्योजकांना कर्ज मिळवून देत नसल्याच्या विरोधात युवा उद्योजक शेखर कांबळे यांनी तिसऱ्यांदा उपोषण सुरू केले आहे.

सातारा : दलित मागासवर्गीय समाजाच्या हितासाठी स्टॅन्डअप इंडिया ही योजना पंतप्रधानांनी अंमलात आणली. संबंधित योजना राबवण्यासाठी प्रत्येक बँकेला शासकीय परिपत्रकानुसार प्रत्येक वर्षी किमान ३ कर्जवाटप करण्याचा आदेशही देण्यात आला. मात्र तांत्रिक अडचणी दाखवून खाजगी बँका उद्योजकांना कर्ज मिळवून देत नसल्याच्या विरोधात युवा उद्योजक शेखर कांबळे यांनी तिसऱ्यांदा उपोषण सुरू केले आहे.
याबाबत जिल्हाधिकारी देण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, 'दोनदा जिल्हाधिकारी कार्याजवळ भीमशक्ती सामाजिक संघटना चंद्रकांत हंडोरे यांच्या नेतृत्वाखाली आमरण उपोषणासाठी बसली. दोन्ही वेळा बँक आणि जिल्हा अग्रणी बँकेचे प्रमुख युवराज पाटील यांनी काही कागदपत्रे द्या  म्हणजे आपले कर्ज प्रकरण त्वरित मंजूर करतो असे खोटे आश्वासन दिले. दोन्ही वेळेला भीमशक्ती संघटनेतर्फे शेखर कांबळे यांनी उपोषण केले. मात्र बँक अधिकाऱ्यांनी खोटे आश्वासन देऊन सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असतानाही हे प्रकरण रेंगाळत ठेवले आहे. विशेष म्हणजे हा प्रकल्प जेवढा आहे, त्या पेक्षा कमी रक्कम घेण्यासाठी बँक अधिकारी दडपण आणत असून बँकेच्या या जातीवाचक धोरणामुळे मागासवर्गीय तरुणांना उद्योजक बनण्यापासून रोखले जात आहे असेही निवेदनात म्हटले आहे.
सोमवारपासून सुरू झालेल्या या उपोषणास बाळासाहेब शिरसट, राजरत्न कांबळे, आनंदराव लादे, सयाजी कांबळे, अरुण पवार, गुलाब बनसोडे, आनंद कांबळे, श्रीकांत कांबळे, वामन म्हस्के, सयाजी कांबळे, संतोष बल्लाळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.