maharashtra

विद्यार्थी वर्गाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर निवडावे : एस. एम. मोटे


Students should choose a career in their field of interest: S. M. Mote
विद्यार्थी वर्गाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर निवडावे. आपला कल पाहून शाखा निवडावी. केवळ आपल्या जवळच्या मित्राने एखादी शाखा निवडली म्हणून आपण ती शाखा निवडू नये. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. करीअर च्या अनेक वाटा आहेत. आपल्याला जी योग्य वाटते ती वाट आपण निवडावी.

पुसेगाव : विद्यार्थी वर्गाने आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर निवडावे. आपला कल पाहून शाखा निवडावी. केवळ आपल्या जवळच्या मित्राने एखादी शाखा निवडली म्हणून आपण ती शाखा निवडू नये. प्रत्येकाची आवड निवड वेगळी असते. करीअर च्या अनेक वाटा आहेत. आपल्याला जी योग्य वाटते ती वाट आपण निवडावी. पालकांनी आपली मते मुलावर लादू नयेत. मुलांना ज्या क्षेत्रात करिअर करायचे आहे त्या क्षेत्रात करिअर करून द्यावे.
प्रत्येक शाखा महत्वाची आहे. करिअर साठी कोणतीही शाखा कमी नाही. दहावी व बारावी नंतर काय?या विषयी निढळ ग्रामपंचायत व जी डी फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित "करिअर मार्गदर्शन शिबीरासाठी मार्गदर्शक वक्ते म्हणुन धनंजयराव गाडगीळ ज्युनियर कॉलेज सातारा चे उपप्राचार्य एस एम मोटे यावेळी बोलत होते. त्यांनी विद्यार्थ्यांना इयत्ता दहावी व बारावी नंतर पुढे काय? याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या अ‍ॅडमिशन संदर्भात आलेल्या प्रश्नांचे निराकरण केले.
या कार्यक्रम प्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच श्री श्रीकांत खुस्पे, ग्रामपंचायत सदस्य,स्कूल कमिटी सदस्य साहेबराव पाटील माजी मुख्याध्यापक शंकरराव खुस्पे, कांबळे एस एन, प्रा. मनोज खुस्पे, पालक वर्ग, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते .प्रास्ताविक नंदकुमार देशपांडे यांनी केले. आभार प्रा अमित भिसे यांनी मानले.