maharashtra

निढळच्या हनुमान विद्यालयाचा एस एस सी निकाल 100 टक्के


SSC result of Nidhal's Hanuman Vidyalaya is 100 percent
निढळ येथील हनुमान विद्यालय च्या एस एस सी परीक्षेत शाळेचा निकाल 100 टक्के लागला.

पुसेगाव : निढळ येथील हनुमान विद्यालय च्या एस एस सी परीक्षेत शाळेचा निकाल 100 टक्के लागला.
गायत्री संजय शिंगाडे हिने 91.40 टक्के गुण, मदने अर्पिता अरविंद 90.4टक्के, सुहानी श्रीकांत खूस्पे 86.20 टक्के गुण मिळवून प्रथम तिन क्रमांक मिळवले. 32 विद्यार्थी विशेष योग्यता, 30 प्रथम श्रेणी, 17 विद्यार्थीनी दुसरी श्रेणी प्राप्त केली.
सर्व यशस्वी विद्यार्थी वर्गाचे रयत शिक्षण संस्था चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी विभागिय आयुक्त चंद्रकांत दळवी, शाळा कमिटी सदस्य एस डी खूस्पे, साहेबराव पाटील, हणमंत यादव, मुख्याध्यापक जगदीश निर्मळ, जेष्ठ शिक्षक कांबळे एस एन, वर्गशिक्षक कापसे, ग्रामस्थ, पालक यांनी अभिनंदन केले.
यावेळी आमच्या शाळेत आम्ही विद्यार्थी वर्गाची गुणवत्ता वाढावी यासाठी नियमित प्रयत्न करत असतो. सर्व शिक्षक यासाठी प्रयत्नशील असतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही मुलींनी निकालात बाजी मारलेली दिसून येते, असे कांबळे यांनी सांगितले.