ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणी एकावर उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घातक शस्त्र जवळ बाळगल्या प्रकरणी एकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नदीत बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना नागठाणे परिसरात घडली आहे.
केळवली (ता. सातारा) येथील धबधबा परिसरात (विकासनगर) राहुल माने (वय 18) व त्याचे मित्र हे शुक्रवारी पर्यटनासाठी आले होते. यावेळी पोहण्याचा मोह न अवरल्याने राहुलही मित्रांसमवेत केळवली धबधब्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. यावेळी मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही.
रयत शिक्षण संस्थेचे प्रशासन कर्मवीर आण्णांच्या आचार विचाराना तीलांजली देत प्रवेश फी, दाखल्यांच्या नावाखाली भरमसाठ फी जमा करत, रयतेची दिवसाढवळ्या डोनेशन च्या नावाखाली अक्षरशः लूट करत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय संस्थांना निवेदन दिले.
सातारा शहराच्या वर्दळीच्या प्रमुख रस्त्यांसाठी केवळ 30 महिला झाडू कामगार पुरेशा आहेत, अशी भूमिका सातारा पालिकेने घेत उर्वरित 90 महिला कामगारांना बाहेरचा रस्ता दाखवल्याने संतप्त झालेल्या महिलांनी मंगळवारी अचानक संप करत पालिकेसमोर धरणे आंदोलन केले.
केंद्रातील भाजप सरकार सूडबुद्धीने काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांना चौकशीच्या नावाखाली आज 26 जुलै रोजी ईडी कार्यालयात पुन्हा दुसऱ्या वेळी बोलावून त्रास देण्याचा व पोलीसिबल वापरून दडपशाही करणाऱ्या केंद्र सरकार विरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी, तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने आज निषेध मोर्चा आंदोलन करण्यात आले.
सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपत्कालीन परिस्थितीमध्ये होणाऱ्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी प्रधानमंत्री पिक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना या योजनेची नोंदणी जिल्ह्यातील सर्व पोस्ट ऑफिस मधून करता येणार आहे. आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील दीडशे शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केल्याची माहिती सातारा मंडल टपाल विभागाचे वरिष्ठ प्रवर अधीक्षक व्यंकटेश्वर रेड्डी यांनी दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी सहाजणांवर दहिवडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.