रयत शिक्षण संस्थेचे प्रशासन कर्मवीर आण्णांच्या आचार विचाराना तीलांजली देत प्रवेश फी, दाखल्यांच्या नावाखाली भरमसाठ फी जमा करत, रयतेची दिवसाढवळ्या डोनेशन च्या नावाखाली अक्षरशः लूट करत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय संस्थांना निवेदन दिले.
उंब्रज : कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयतेच्या गोर गरीब मुलांच्या शिक्षणासाठी रयत शिक्षण संस्था उभी केली. मात्र रयत शिक्षण संस्थेचे प्रशासन कर्मवीर आण्णांच्या आचार विचाराना तीलांजली देत प्रवेश फी, दाखल्यांच्या नावाखाली भरमसाठ फी जमा करत, रयतेची दिवसाढवळ्या डोनेशन च्या नावाखाली अक्षरशः लूट करत आहे. याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शालेय संस्थांना निवेदन दिले.
निवेदनात असे म्हटले आहे की, आपल्या संस्थेत ११ वी कला शाखेच्या एकूण ३ तुकड्या अनुदानित आहेत. १२ वी कला शाखेच्या एकूण ३ तुकड्या अनुदानित आहेत. ११ वी वाणिज्य शाखेची अनुदानित १ व विना अनुदानित १ तुकडी आहे. १२ वी वाणिज्य शाखेच्या अनुदानित १ तुकडी व विना अनुदानित १ तुकडी आहे. ११ वी विज्ञान शाखेची अनुदानित १ तुकडी व विना अनुदानित २ तुकड्या आहेत. १२ वी विज्ञान शाखेची अनुदानित १ तुकडी व विना अनुदानित २ तुकड्या आहेत.
शासन निर्णया नुसार काही तुकड्या विना अनुदानित तत्वावर चालवल्या जात आहेत. तरी विद्यार्थांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व त्यांच्या हक्काच्या सोयी सुविधा व त्यांना मिळणाऱ्या शैक्षिणक सवलती, त्यांचे सरक्षण, मुख्यतः विद्यार्थिनीना संरक्षण, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व फी माफी वेळेवर मिळाली पाहिजे. परंतु प्रवेश देण्यासाठी सर्व नियम पायदळी तुडवत पालकांकडून डोनेशन च्या नावाखाली खंडणी उकळण्याचा धंदा राजरोसपणे चालु आहे. तरी आपल्या संस्थेस आम्ही या निवेदनाद्वारे विनंती करत आहोत, विद्यार्थी हिताची मागणी करीत आहोत. तरी सदर गोष्टी आपण गांभीर्याने घ्याल ही अपेक्षा बाळगतो. अन्यथा आम्हाला तीव्र आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
यावेळी सातारा जिल्हा उपाध्यक्ष अमोल सुभाष कांबळे, कराड तालुका अध्यक्ष रणजीत कदम, महिला सेना सातारा अध्यक्ष मीनाक्षीताई पोळ, उंब्रज शहर अध्यक्ष विजय वाणी, शहर अध्यक्ष मनविसे विजय माने आणि महाराष्ट्र सैनिक निलेश माने, प्रणव जाधव, अनिल जाधव, दिपक हजारे, सुनिल जाधव, सोहम जाधव उपस्थित होते.


