maharashtra

केळवली धबधब्यात बुडालेल्या युवकाचा मृतदेह चार दिवसांनी सापडला


The body of the youth who drowned in the Kelavali waterfall was found after four days
केळवली (ता. सातारा) येथील धबधबा परिसरात (विकासनगर) राहुल माने (वय 18) व त्याचे मित्र हे शुक्रवारी पर्यटनासाठी आले होते. यावेळी पोहण्याचा मोह न अवरल्याने राहुलही मित्रांसमवेत केळवली धबधब्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. यावेळी मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही.

सातारा : केळवली (ता. सातारा) येथील धबधबा परिसरात (विकासनगर) राहुल माने (वय 18) व त्याचे मित्र हे शुक्रवारी पर्यटनासाठी आले होते. यावेळी पोहण्याचा मोह न अवरल्याने राहुलही मित्रांसमवेत केळवली धबधब्यात उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. यावेळी मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात यश आले नाही.
त्यानंतर सर्व मुले सातारला निघून आली. कुटुंबियांना ही घटना समजताच पोलिसांना कळवण्यात आले. तोपर्यंत रात्र होत आली होती. त्यामुळे दुसर्‍या दिवशी (शनिवार) शोध मोहिम सुरू केली. धबधबा परिसरात शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमच्या मदतीने शोधकार्य अविरतपणे सुरू ठेवले.
शुक्रवारपासून राहुल माने या युवकाचा पोलीस यंत्रणा शोध घेत होती. यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले रेक्स्यू टीमची मोलाची साथ मिळाली. मात्र वरुन कोसळणारा धबधबा व मोठ- मोठे दगड यामुळे शोधकार्यात अडचणी निर्माण होत होत्या. अखेर आज (मंगळवार) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास धबधबा परिसरात केळवलीचे पोलीस पाटील काही ग्रामस्थ शोध घेत होते. यावेळी धबधब्यापासून सुमारे सत्तर फूट अंतरावर बेपत्ता युवकाचा मृतदेह दगडाजवळ दिसला. यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.