maharashtra

उरमोडी नदीत बुडून एकाचा मृत्यू


One died after drowning in Urmodi river
नदीत बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना नागठाणे परिसरात घडली आहे.

सातारा : नदीत बुडून एकाचा मृत्यू झाल्याची घटना नागठाणे परिसरात घडली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 25 जुलै रोजी संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या दरम्यान नागठाणे परिसरातील उरमोडी नदीच्या वाहत्या पात्रात एक पुरुष जातीचा मृतदेह तरंगत असल्याच्या अवस्थेत आढळून आला. अधिक माहिती घेतली असता तो मृतदेह मनोज उर्फ सनी सुधाकर गडकरी वय 29 राहणार नागठाणे तालुका सातारा यांचा असल्याचे निष्पन्न झाले. याबाबतची खबर सुनीता राहुल गडकरी वय 45 यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दिली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार सावंत करीत आहेत.