लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एप्रिल 2020 ते 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी व विविध ठिकाणी एका महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी शंकर वारंग वय 40, राहणार शाहूपुरी, सातारा याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सी.एस. मोटे करीत आहेत.


