गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया..च्या जयघोषात आज सातारा जिल्हावासीयांनी मोठ्या आनंदाने धार्मिक वातावरणात आणि ढोल-ताशांच्या निनादात आपल्या लाडक्या गणरायाला घरोघरी आणून स्थापन केले.
ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर नाव दुरुस्त करण्यासाठी ४० हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या कराड, ता. कराड येथील तलाठी सागर दत्तात्रय पाटील यांच्या विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे.
सौंदरी, ता. महाबळेश्वर येथून अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचे दोन विजेचे खांब चोरून नेल्याची तक्रार महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
गोविंद मिल्क डेअरी मधील मिल्क पावडर चोरी केल्याप्रकरणी तिघांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका ग्रामसेवकावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी दोघांवर मल्हारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा येथील नामांकित शाळेत शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलाचे अज्ञाताने अपहरण केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
करंजे नाका ते मोळाचा ओढा दरम्यान रस्त्यांवर सातार्यातील व्यापार्यांनी पत्र्याची लोखंडी शेड्स उभारुन मेढा-सातारा मुख्य रस्त्यावरच गेल्या काही वर्षात अतिक्रमणे केलेली आहेत. त्याविरोधात गेली आठ महिने आंदोलने, पत्रव्यवहार करुनही त्यावर कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र खजिनदार सरदार (सागर) भोगांवकर यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आमरण उपोषण सुरु केले आहे.
सातारा जिल्ह्याचे सुपूत्र तथा राज्याचे नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेले दोन दिवस सातारा जिल्ह्याच्या दौर्यावर होते. या दोन दिवसांत जिल्ह्याचा दौरा असला तरी ते महाबळेश्वर-जावली तालुक्यातच घुटमळले. मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदेंचा हा दुसरा जिल्हा दौरा होता.
उधारी देण्याच्या कारणावरून दोघांवर सत्तुरने वार केल्याप्रकरणी एकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.