मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी बुधवारी सातारा शहरात फेरफटका मारुन पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली. यावेळी व्यवसायिकांशी चर्चाही त्यांनी केली.
सातारा : मंत्री ना.शंभूराज देसाई यांनी बुधवारी सातारा शहरात फेरफटका मारुन पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली. यावेळी व्यवसायिकांशी चर्चाही त्यांनी केली.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी ना.शंभूराज देसाई यांनी कमानी हौद, राजवाडा, मोती चौक, बॉम्बे रेस्टॉरंट येथे भेटी दिल्या. यावेळी प्रशासनाची तयारी व पोलिस बंदोबस्ताची पाहणी त्यांनी केली. यावेळी गणेश मंडळाचे पदाधिकारी, गणेश मुर्ती विक्रेते, नागरिक, पोलिस अधिकारी यांच्याशी संवादही त्यांनी साधला. यावेळी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्हाडे त्यांच्यासोबत होते.