गोविंद मिल्क डेअरी मधील मिल्क पावडर चोरी केल्याप्रकरणी तिघांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : गोविंद मिल्क डेअरी मधील मिल्क पावडर चोरी केल्याप्रकरणी तिघांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 21 ऑगस्ट रोजी सकाळी सहा ते सात वाजण्याच्या दरम्यान शिरीषकुमार गणपत लावंड राहणार गणेश शेरी, धुळदेव, तालुका फलटण व इतर दोन अनोळखी इसमांनी गोविंद मिल्क डेअरी मधील स्कीम्ड मिल्क पावडर गोडाऊन मधील 50 पोती मिल्क पावडर त्याची किंमत 3 लाख 80 हजार आहे. ती पावडर माल पिकअप क्रमांक एमएच 23 डब्ल्यू 3064 मधून चोरून नेली आहे. याबाबतची फिर्याद योगेश प्रतापराव रणवरे वय 43 राहणार स्वामी विवेकानंद नगर, फलटण, तालुका फलटण यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम करीत आहेत.


