maharashtra

सौंदरी येथून दोन विजेचे खांब चोरीस


सौंदरी, ता. महाबळेश्वर येथून अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचे दोन विजेचे खांब चोरून नेल्याची तक्रार महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

सातारा : सौंदरी, ता. महाबळेश्वर येथून अज्ञात चोरट्यांनी १५ हजार रुपये किमतीचे दोन विजेचे खांब चोरून नेल्याची तक्रार महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. १५ रोजी ११ वाजण्यापूर्वी सौंदरी गावच्या हद्दीतील शिवारातून अज्ञात चोरट्यांनी पंधरा हजार रुपये किमतीचे दोन विजेचे खांब चोरून नेल्याची तक्रार वायरमन धनाजी सुरेश चव्हाण रा. तापोळा यांनी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिली आहे.