कठड्याला मोटर सायकल धडकून झालेल्या अपघातात तौफिक रफिक शेख 28 राहणार पाचवड, तालुका वाई हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आरोपी कुमार भोईटे व राजेंद्र भोईटे यांनी एसटीमधील भांडणाच्या प्रकरणात एसटी पोलीस स्टेशनला घेण्यास एसटी ड्रायव्हरला सांगितले. परंतु एसटी चालकाने नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून फिर्यादी अशोक खाशाबा मांडवे वय 56 राहणार वाठार तालुका कोरेगाव यांना केबिनमध्ये जाऊन शिवीगाळ केली व एसटी बसची काच फोडण्यात आली.
सातारा-लोणंद रस्त्यावर पाटखळ गावाच्या हद्दीत माऊली लॉज समोर देशी बनावटीचे 15 हजार रुपये किमतीचे पिस्टल बाळगणाऱ्या सुयोग दिलीप कदम राहणार मालगाव, तालुका सातारा याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडील पिस्टल जप्त करण्यात आले आहे.
कराड तालुक्यातील कालेटेक येथे बस थांब्याजवळच चोरटी दारू विक्री सुरू होती. याचा त्रास बस थांब्यावरील महिला, विद्यार्थिनींसह प्रवाशांना होत होता. कालेटेकचे पोलीस पाटील विठ्ठल जाधव व महेश जाधव यांच्याकडे तक्रारी आल्यानंतर त्यांनी पोलिसांच्या मदतीने दारू विक्री रोखली. सहाय्यक पोलीस निरिक्षक बिराजदार यांनी याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
एकवीरा आई मंदिर हे महाराष्ट्रातील लोणावळा या गावाजवळ कार्ला लेण्याजवळ आहे. आगारी कोळी समाजासह अन्य लोकांचेही हे कुलदैवत आहे. पौराणिक कथेनुसार कार्ला येथील मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते. तसेच एकवीरा देवी हा रेणुका मातेचा अवतार आहे.
मी पुन्हा जन्माला आलो तर पहिलवानच होईन अन् असलंच अजून एखादं पदक माझ्या भारताला मिळवून देईन,’ असं म्हणणारा लाल मातीतला पैलवान म्हणजे सातारा जिल्ह्याचा सुपुत्र ऑलिंपिक पदकवीर खाशाबा जाधव.
सातारा शहरातून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
दिगंबर आगवणे च्या अडचणीत आणखी भर पडले असून फलटण शहर पोलीस ठाण्यात आगवणेवर 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मुलीसह विवाहिता बेपत्ता झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.