maharashtra

अपघातातील जखमी युवकाचा मृत्यू


कठड्याला मोटर सायकल धडकून झालेल्या अपघातात तौफिक रफिक शेख 28 राहणार पाचवड, तालुका वाई हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

सातारा : कठड्याला मोटर सायकल धडकून झालेल्या अपघातात तौफिक रफिक शेख 28 राहणार पाचवड, तालुका वाई हा गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी अशपाक झाकीर शेख वय 25 राहणार अहिरे, तालुका खंडाळा यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिनांक 24 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता भोळी तालुका खंडाळा गावच्या हद्दीत शिवथरे पेट्रोल पंपाजवळ लोणंद शिरवळ मार्गावर तौफिक शिरवळच्या दिशेने जात असताना दुचाकी कठड्याला जोरदार आदळली. या अपघातात तौफिक गंभीर जखमी झाला होता. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक अंदेलवार अधिक तपास करत आहेत.