maharashtra

दिगंबर आगवणे च्या अडचणीत भर

50 लाखाची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल

दिगंबर आगवणे च्या अडचणीत आणखी भर पडले असून फलटण शहर पोलीस ठाण्यात आगवणेवर 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : दिगंबर आगवणे च्या अडचणीत आणखी भर पडले असून फलटण शहर पोलीस ठाण्यात आगवणेवर 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2014 पासून वेळोवेळी ते 23 नोव्हेंबर रोजीच्या सकाळी साडेदहा वाजण्याच्या दरम्यान दिगंबर रोहिदास आगवणे राहणार गिरवी तालुका फलटण याने नारायण सुभेदार गोळे वय 46 राहणार गोळेगाव पुनर्वसन लोणंद तालुका खंडाळा यांनी दिगंबर रोहिदास आगवणे, स्नेहल रवींद्र बनसोडे, अविनाश पोपट रिटे (तिघे राहणार गिरवी, तालुका फलटण), चंद्रकांत लक्ष्मण रांजणे, दत्तात्रय लक्ष्मण रांजणे, अनुसया उर्फ बाई तुकाराम रांजणे, पुष्पा आनंद रांजणे, लिलाबाई लक्ष्मण रांजणे, सोनल आनंद रांजणे (सर्व राहणार दापोडी, तालुका जावली) आणि तीन अनोळखी व्यक्ती (नाव, पत्ता माहिती नाही) यांच्याकडून खरेदी केलेली जमीन तलाठी, मंडलाधिकारी तडवळे, तालुका फलटण यांना हाताशी धरून बेकायदेशीररित्या ती जमीन स्नेहल रवींद्र बनसोडे आणि अविनाश पोपट रिटे यांच्या नावे करून गोळे यांची फसवणूक केली. तसेच आगवणे व त्याच्या तीन अनोळखी साथीदारांनी गोळे यांचे अपहरण करून पिस्टल, काठी याचा धाक दाखवून काठीने मारहाण करून, ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करीन, अशी धमकी देऊन गोळे यांना 50 लाख रुपयांची खंडणी मागितली. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक फौजदार शिंदे करीत आहेत.