maharashtra

मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी एकावर गुन्हा


मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सातारा : मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी ट्रॅक्टर चालकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास ट्रॅक्टर चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर अविचाराने, बेदरकारपणे, भरधाव वेगात व रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालवून ट्रॅक्टर मध्ये बसलेले बबन भिकू काकडे वय 72, रा. किडगाव, तालुका सातारा यांना अपघातात रस्त्यावर पडून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.