प्राथमिक शिक्षक बँक परिसरातील टिळक मेमोरियल चर्चच्या संरक्षक भिंती लगत असणारे जम्बो रसवंती ग्रह सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने गुरुवारी हटवले. हे रसवंती ग्रह पालिकेच्या जागेतच उभारण्यात आल्याने हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, अशी मागणी लोकशाही दिनात झाली होती.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश चिटणीस व प्रसिद्ध व्यावसायिक रमेश उबाळे यांनी कृष्णा नगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रस्तावित इमारती समोर गुरुवारपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या संजीवन समाधी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रथपूजन महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले.
विंग, ता. कराड येथील शेतामध्ये ऊस तोडत असताना मजुरांना आढळून आलेल्या आढळलेल्या बिबट्याच्या तीनही पिल्लांना बिबट्या मादीने रात्री 9.30 ते पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान सुखरूपपणे उचलून आपल्या अधिवासाकडे नेले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य करताना आ. शहाजी पाटील शुद्धीत होते का? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी शुद्धीत राहून शरद पवार यांच्याबाबत वक्तव्य करावे, असा सल्ला विधान परिषदेचे सदस्य आ. शशिकांत शिंदे यांनी त्यांना दिला.
फलटण शहरात घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
शिरवळ येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
विनयभंगासह एकावर पोक्सो अंतर्गत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी तिघांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मारहाणीसह विनयभंग केल्याप्रकरणी सहा जणांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.