विनयभंगासह एकावर पोक्सो अंतर्गत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सातारा : विनयभंगासह एकावर पोक्सो अंतर्गत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहरा नजीकच्या उपनगरात राहणारी अल्पवयीन मुलगी दि. 19 डिसेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता तिच्या प्रोजेक्टचे साहित्य आणण्यासाठी दुकानात गेली असता तेथील आरोपीने तिला उचलून घरात नेऊन तिच्याशी असभ्य वर्तन केले. याप्रकरणी संबंधितावर पोक्सो अंतर्गत शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुल्ला करीत आहेत.