प्राथमिक शिक्षक बँक परिसरातील टिळक मेमोरियल चर्चच्या संरक्षक भिंती लगत असणारे जम्बो रसवंती ग्रह सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने गुरुवारी हटवले. हे रसवंती ग्रह पालिकेच्या जागेतच उभारण्यात आल्याने हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, अशी मागणी लोकशाही दिनात झाली होती.
सातारा : प्राथमिक शिक्षक बँक परिसरातील टिळक मेमोरियल चर्चच्या संरक्षक भिंती लगत असणारे जम्बो रसवंती ग्रह सातारा पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाने गुरुवारी हटवले. हे रसवंती ग्रह पालिकेच्या जागेतच उभारण्यात आल्याने हे अतिक्रमण तात्काळ काढण्यात यावे, अशी मागणी लोकशाही दिनात झाली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली. प्रशांत निकम आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई करून संपूर्ण पदपथ मोकळा केला आहे.
सातारा शहर परिसरामध्ये वाढणारी अतिक्रमणे हा चिंतेचा विषय आहे. मात्र अतिक्रमण हटाव विभागाच्या कारवाई सातत्य असले तरी धाक नसल्याने कोठेही अतिक्रमण गाजर गवतासारखी उगवत आहेत. येथील टिळक मेमोरियल चर्चा भिंतीलगत पंकज पवार या इसमाने पालिकेची कचराकुंडी हटवल्यानंतर झालेल्या मोकळ्या जागेत जम्बो रसवंतीगृह उभारले होते. त्याकरता तो सहा हजार रुपये भाडे मोजत होता आणि त्यातील काही रक्कम मंडई निरीक्षक आणि अतिक्रमण हटाव विभागाचे प्रमुख प्रशांत निकम यांना देत होता, अशी तक्रार संतोष देडगे या सामाजिक कार्यकर्त्यांनी लोकशाही दिनामध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. या संदर्भात तक्रार झाल्यानंतर नगरपरिषद संकलन विभागाने सातारा पालिकेला कारवाई करण्याची या संदर्भात निर्देश दिले होते.
त्यानुसार प्रशांत निकम आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी सकाळी 11 वाजता रविवार पेठ येथे जाऊन टिळक मेमोरियल चर्चा परिसरातील जम्बो रसवंती ग्रह तातडीने हटवले. यावेळी रसवंतीगृहाच्या कारवाईदरम्यान तेथील कर्मचारी आणि पालिकेची यंत्रणा यांच्यात काही काळ शाब्दिक बाचाबाची झाली. टिळक चर्च पदपथावरील जम्बो रसवंतीग्रह हटवण्यात आल्याने तेथील परिसर पूर्णतः मोकळा झाला आहे. येथे पुन्हा कोणतेही अतिक्रमण होऊ नये याकरता विशेष दक्षता घेतली जाणार असल्याचे अतिक्रमण हटाव पथकाचे प्रमुख प्रशांत निकम यांनी सांगितले.


