maharashtra

फलटण शहरात घरफोडी

चोरट्याने केला सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल लंपास

फलटण शहरात घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : फलटण शहरात घरफोडी करून अज्ञात चोरट्याने सुमारे दीड लाखाचा मुद्देमाल लंपास केल्याची नोंद फलटण शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 18 ते 19 डिसेंबर दरम्यान ज्ञानेश्वर नारायण होळ रा. रामबाग कॉलनी, फलटण, ता. फलटण यांच्या ऑफिसच्या शटर चे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने ऑफिस मधील साहित्य आणि रोख रक्कम असा 1 लाख 35 हजार 667 रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याबाबतची फिर्याद फलटण शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.