maharashtra

शिरवळ येथे घरफोडी


शिरवळ येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

सातारा : शिरवळ येथे अज्ञात चोरट्याने घरफोडी केल्याची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 19 डिसेंबर रोजी अक्षय आबाजी चांगण रा. चौपाळा, शिरवळ, ता. खंडाळा यांच्या राहत असलेल्या फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप कशाने तरी तोडून अज्ञात चोरट्याने घरातील लॉकर मध्ये ठेवलेले एक लाख 65 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. या घटनेची नोंद शिरवळ पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आंदेलकर करीत आहेत.