गेल्या काही वर्षात फलटणमधील संघटीत गुन्हेगारीला चांगला चाप बसला होता. अपवादात्मक घटना वगळता फलटण शांत होते. मात्र, बुधवारी पुन्हा संघटीत गुन्हेगारीने डोके वर काढले असून यामध्ये ठोस कारवाई झाली नाही तर फलटणमध्ये डोक्याला ताप होणारच, खून होणारच अशी स्थिती निर्माण होवू पाहत आहे. त्यामुळे पोलिसांनी राजकीय दबाव झुगारुन खर्या अर्थाने कायद्याचे राज्य असल्याचे दाखवत गुन्हेगारी प्रवृत्तींना मोक्का लावण्याची गरज असल्याची आजच्या घडीला तमाम फलटणकरांमध्ये भावना आहे.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!