मांडवे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सागर चंदनशिवे यांची बिनविरोध निवड झाल्याने अखेर गावास गावकारभारी मिळाला.
तडवळे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गणपत निवृत्ती खाडे-पाटील यांची तर उपसरपंचपदी संगीता भीमराव माळवे यांची बिनविरोध निवड झाली. त्रिशंकू संख्याबळाच्या परिस्थितीत नाट्यमय घडामोडी घडण्याबरोबर ‘पाटीलकी’ने आपल्या राजकीय कौशल्याचा वापर करत पुन्हा एकदा ग्रामपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
‘अंबवडे (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीचे नूतन सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस विचारानेच कार्यरत राहणार आहे,‘ अशी ग्वाही पॅनेलप्रमुख प्रकाशशेठ नलवडे यांनी दिली.
दरुज (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नंदा किसनराव खामकर यांची तर उपसरपंचपदी रोहित चंद्रकांत लावंड यांची बिनविरोध निवड झाली आहे. नंदा या वडूज वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अॅड. किसनराव खामकर यांच्या पत्नी आहेत.
सातेवाडी (ता. खटाव) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वृषाली विक्रम रोमन तर उपसरपंचपदी भाऊसाहेब महादेव बोटे यांची बहुमताने निवड झाली आहे. या ग्रामपंचायतीत जानुबाई ग्रामविकास पॅनेलने 9 पैकी 6 जागा जिंकून वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
दातेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गौरी नीलेश पवार तर उपसरपंचपदी रंजना काशिनाथ जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
सूर्याचीवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी रंजना मनोहर गायकवाड यांची तर उपसरपंचपदी रामचंद्र बाळासाहेब घोलप यांची बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेसचे नेते रणजितसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखालील नरसिंह ग्रामविकास पॅनेलने बहुमत प्राप्त केले आहे. निवडीनंतर सरपंच गायकवाड, उपसरपंच घोलप तसेच नवनिर्वाचित सदस्यांचा रणजित भैय्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
डांभेवाडी (ता. खटाव) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी किशोर चंद्रकांत बागल तर उपरसंपचपदी रघुनाथ विठ्ठल औताडे यांची बिनविरोध निवड झाली आहे.
खटाव तालुक्यातील आदर्श गाव असलेल्या निढळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी बायडाबाई संतोष ठोंबरे तर उपसरपंचपदी श्रीकांत बबन खुस्पे यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर श्री सिद्धिविनायक ग्रामविकास पॅनेलच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.
माण तालुक्यातील काळचौंडी गावच्या सरपंचपदी राणी भाऊ माने तर उपसरपंचपदी अर्चना आबा कोरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.
टाकेवाडी (ता. माण) येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरंपचपदाच्या निवडीवर अनपेक्षितपणे राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश चिटणीस दादासो काळे यांनी बाजी मारली. त्यांचे खंदे समर्थक नीलेश अंकुश दडस यांची सरपंचपदी तर सीमा शिवाजी ताटे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली असून, ग्रामपंचायतीवर राष्ट्रीय काँग्रेसचा झेंडा रोवण्याचे काम दादासो काळेंनी करून दाखवले.