milknews

esahas.com

दुष्काळी भागातील दुग्ध उत्पादक शेतकरी भाव घसरल्याने तोट्यात

माण तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रूत अन् परिचित आहे. कधी सुकाळ तर कधी दुष्काळ अशा निसर्गाच्या लहरीवर इथला शेतकरी जगत आहे. केवळ लहरी शेतीवर अवलंबून न राहता शेतीला जोडधंदा म्हणून संकरित गाई जोपासून दुग्ध व्यवसाय सुरू ठेवला आहे. या व्यवसायावर अनेकांचे संसार उभे आहेत. मात्र, सध्या अघोषित दुधाचे दर खाली आले असल्याने शेतकर्‍यांचा जोडधंदा तोट्यात जाणार असल्याची चिन्ह निर्माण झाली आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे पशुधन जोपासले असून ते धोक्यात आले आहे.