helpinghandtotheneedyduringaniketslockdownofhingangaon..!

esahas.com

‘हिंगणगाव’च्या अनिकेतचा लॉकडाऊन काळात गरजूंना मदतीचा हात..!

जगात कोरोना महामारीनं थैमान घातल्यामुळं संसर्ग टाळण्यासाठी शासनानं सर्वत्र ‘लॉकडाऊन’ जाहीर केलं. त्यामुळं सर्वांना ‘घरबंद’ व्हावं लागलं. दरम्यानच्या काळात सर्व उद्योग-धंदे बंद पडले. त्यामुळे हातावर पोट असणार्‍यांवर उपासमारीची वेळ आली. त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागलं. पण समाजात अशी काही माणसं असतात की, ज्यांच्यात समाजाप्रती काहीतरी नवं करून दाखवण्याची तळमळ असते. अशाच एका तरुण ‘कोरोना योद्ध्या’नं लॉकडाऊन काळात मुंबई माण खुर्द शिवाजीनगर येथील गरीब-गरजूंना मदतीचा हात अन् मायेची ऊब देऊन समाज