formermumbaipolicecommissionersanjaypandeyarrestedbyed

esahas.com

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना ईडी कडून अटक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने पांडेंना बेड्या ठोकल्या आहेत. एनएसई फोन टॅपिंग प्रकरणात पांडेंवर कारवाई करण्यात आली आहे. २००९ ते २०१७ या काळात पांडेंनी बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याचा आरोप आहे. ५ जुलै रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात संजय पांडेंची ईडीने चौकशी केली होती.