auniqueagitationbythebjpinphaltancallingforopenthedoor

esahas.com

फलटणमध्ये ‘भाजपा’तर्फे ‘दार उघड उद्धवा दार उघड’ची हाक देत अनोखे आंदोलन

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर गेल्या चार ते पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे कुलूपबंद असल्याने भाविकांना आपल्या आराध्य दैवतांचे दर्शन, भजन, पूजन करणे अवघड झाले आहे. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे, मंदिरे नियमित उघडण्याच्या मागणीसाठी खा. रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण येथे ‘भाजपा’तर्फे ‘दार उघड उद्धवा, दार उघड’ अशी हाक देत आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात दि. 18 मार्चपासूनच मंदिरे व सर्व धार्मिक पूजा बंद आहेत.