sports

पुसेगावच्या सरपंचपदी महाविकास आघाडीचे विजय मसणे बिनविरोध


खटाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुसेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाविकास आघाडीच्या विजय मसणे तर उपसरपंचपदी पृथ्वीराज जाधव यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला. 

निढळ : खटाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुसेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाविकास आघाडीच्या विजय मसणे तर उपसरपंचपदी पृथ्वीराज जाधव यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला. 

पुसेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी (दि. 27) दुपारी सरपंचपदाच्या निवडीसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. सरपंचपदासाठी विजय मसणे तर उपसरपंच पदासाठी पृथ्वीराज जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात येत असल्याचे निवडणूक अधिकारी तथा विस्ताराधिकारी लक्ष्मण पिसे यांनी जाहीर केले. ग्रामविकास अधिकारी एन. एम. नाळे यांनी निवड प्रक्रिया उत्तम प्रकारे हाताळली. 

यावेळी रणधीरशेठ जाधव, सुरेशशेठ जाधव, विशाल जाधव, कमरुनिसा शिकलगार, दीपाली जाधव, सुरेखा जाधव, स्नेहा मदने, अभिजित जाधव, दीपाली तारळकर, शकुंतला जाधव, पृथ्वीराज जाधव, मधुकर टिळेकर, मोनिका जाधव, संजय जाधव, दीपाली मुळे, सुप्रिया जाधव असे 15 ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. 

सहायक पोलीस निरीक्षक विश्‍वजित घोडके यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

दरम्यान, पुसेगाव ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना प्रणित श्री सेवागिरी महाविकास आघाडीने सतरा पैकी चौदा जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करून एकहाती सत्तांतर केले. तर सत्ताधारी श्री सेवागिरी जनशक्ती संघटनेला तीन जागांवर समाधान मानावे लागले होते.

नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच यांचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माजी चेअरमन अ‍ॅड. विजयराव जाधव, माजी पं. स. सदस्य मोहनराव पाटील, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रताप जाधव, योगेश देशमुख, संतोष तारळकर, राम जाधव, दत्ता जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी अभिनंदन केले.