कोरोना तसेच अवकाळीच्या पार्श्वभूमीवर पुसेगाव (ता. खटाव) सह परिसरातील सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट पूर्ण कोलमडले असतानाच महावितरणचे अधिकारी कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करत आहेत. सोमवारी (ता. 15) महावितरणचे अधिकारी बोलेरो गाडीतून पुसेगाव येथे वीजतोडणीस जात असताना संतप्त शिवसैनिकांनी त्यांची गाडी फोडली.
खटाव तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुसेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी महाविकास आघाडीच्या विजय मसणे तर उपसरपंचपदी पृथ्वीराज जाधव यांची बिनविरोध निवड झाली. बिनविरोध निवडीनंतर महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून जल्लोष साजरा केला.
Subscribe our newsletter to get the best stories into your inbox!