sports

ग्रामसेवकाला मारहाण करणार्‍याला दहा महिने साधी कैद


रांजणी, ता. मेढा येथे ग्रामपंचायत कार्यालयात बैठक सुरू असतानाच तेथे येत ग्रामसेवकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

सातारा : रांजणी, ता. मेढा येथे ग्रामपंचायत कार्यालयात बैठक सुरू असतानाच तेथे येत ग्रामसेवकाला मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आरोपीला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने दहा महिने साध्या कैदेची शिक्षा सुनावली.

याबाबत माहिती अशी, दि. 02 जुलै 2020 रोजी सायंकाळी 4.15 च्या सुमारास रांजणी गावचे ग्रामसेवक दुर्योधन बळीराम शेलार कोरोना विषाणु प्रादुर्भाव अनुशंगाने सरपंच व सदस्य यांच्यासोबत कार्यालयातील मिटींगमध्ये चर्चा करत होते. यावेळी आरोपी राजेंद्र बाबुराव राजने वय 38 व्यसाय शेती. रा. रांजणी, ता. जावली हा त्याठिकाणी आला. त्याने शेलार यांच्या टेबलासमोर येवून विनाकारण पायातील चप्पल काढुन फिर्यादी यांच्या गालावर मारली. तसेच शिवीगाळ दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली व शासकीय कामकाजात अडथळा आणला. याबाबतची फिर्याद ग्रामसेवक शेलार यांनी मेढा पोलिस ठाण्यात दिल्यानंतर शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

याप्रकरणी आरोपीविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. गुन्हयाचा तपास तत्कालीन पो.उप निरीक्षक एस.सी.चामे मेढा पोलीस स्टेशन यांनी करुन आरोपी विरुद्ध सबळ पुरावे तसेच शास्त्रोक्त पुरावा प्राप्त करुन मुदतीत न्यायालयामध्ये दोषारोप पत्र सादर केले होते. नमुद खटल्याची सुनावणी अति जिल्हा सत्र न्यायाधिश एस. जी. नंदीमठ सो डी.जे.04 सातारा यांचे न्यायालयामध्ये झाली. दि.03 एप्रिल 2021 रोजी न्यायालयाने आरोपी राजेंद्र बाबुराव रांजने वय 38 वर्ष रा.रांजनी ता. जावली, जि. सातार यास कलम 353 अन्वये 10 महीने साधी कैद व 323 खाली 6 महीने साधी कैद अशी शिक्षा दिली आहे.

सुनावणीत सरकारी अभियोक्ता म्हणून एम. यु. शिंदे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून सहा पो. फौजदार राजेभोसले मेढा पोलीस स्टेशन तसेच प्रॉसिक्युशन स्क्वॉड साताराचे राजेंद्र यादव (पोलीस उपनिरीक्षक) अंमलदार स. पो.उप. नि. श्रीमती घारगे, पो.हवालदार शेख, बेंद्रे, शिंदे, शेख, कुंभार, घोरपडे, भरते यांनी केसमध्ये सरकारी वकील यांना योग्य ते सहकार्य  व साक्षीदार यांना योग्य ते मार्गदशन केले.
पोलीस अधीक्षक श्रीअजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा धिरज पाटील, पो. उप. अधीक्षक गृह राजेंद्र साळुंखे यांनी तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. सी. चामे व पैरवी अधिकारी सहा.पो.फोजदार राजेभोसले आणि प्रॉसिक्युशन स्क्वॉड साताराचे अंमलदार यांचे अभिनंदन केले आहे.