cineworld

फक्त फायदाच नाहीतर नुकसानदायीही ठरतात तांब्याची भांडी


आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक टिप्स आणि ट्रिक्स आपण वाचतो. खरे तर, जेवढ्या समस्या तेवढेच त्यांच्यावरील उपाय. त्यांपैकीच एक आहे, तांब्याच्या भांड्यामध्ये जेवण तयार करण्याचे फायदे. एवढचं नाहीतर अनेक लोक तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात. 

आरोग्याची काळजी घेण्यासाठी अनेक टिप्स आणि ट्रिक्स आपण वाचतो. खरे तर, जेवढ्या समस्या तेवढेच त्यांच्यावरील उपाय. त्यांपैकीच एक आहे, तांब्याच्या भांड्यामध्ये जेवण तयार करण्याचे फायदे. एवढचं नाहीतर अनेक लोक तांब्याच्या भांड्यातील पाणी पितात. 

अनेकदा आपण ऐकतो की, तांबे किंवा तांब्याच्या भांड्यांमध्ये जेवण किंवा पाणी पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. तांबे म्हणजेच कॉपर. शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करते. ज्यामुळे तुम्हाला फिट अन् फाइन होण्यास मदत होते. तांब्यांच्या भांड्यांमध्ये जेवण करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. तसेच काही असे पदार्थ आहेत. जे तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवणे किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवून त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. 

जसे की, दूध, दही आणि लोणची यांसारखे पदार्थ तांब्याच्या भांड्यांमध्ये ठेवल्याने आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.  तांब्याच्या भांड्यामध्ये लोणची ठेवल्याने कॉपरच्या संपर्कात येऊन पॉयझनिंग इफेक्ट तयार होतात. याच्या सेवनाने तुम्हाला फूड पॉयझनिंग, पोटात जळजळ, अ‍ॅसिडीटी आणि अपचन यांसारख्या समस्या उदभवू शकतात. 

तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले लोणचे जास्त दिवस टिकतही नाही. दह्यामध्ये शरीराला आवश्यक असणारे अनेक गुड बॅक्टेरिया अस्तित्त्वात असतात. ज्यामुळे तांब्याच्या भांड्यामध्ये हे ठेवल्याने यामध्ये केमिकल रिअ‍ॅक्शन होऊन त्याचे उलटे परिणाम दिसून येतात. दूध किंवा दूधापासून तयार करण्यात आलेले पदार्थ तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवल्याने त्यातील पोषक तत्व नष्ट होतात. 

तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवलेले दही खाल्याने उलटी, डायरिया आणि पोटासंबंधातील आजारांचा सामना करावा लागतो.  तांब्याच्या भांड्यातील पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते पण जर यामध्ये लिंबू सरबत किंवा लिंबाचा वापर करून तयार केला जाणारा कोणताही पदार्थ खाण्याचा विचार करत असाल तर असे अजिबात करू नका. 

कारण असे करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरते. लिंबाच्या रसामध्ये असणारे अ‍ॅसिड तांब्यासोबत एकत्र येते आणि केमिकल रिअ‍ॅक्शन होते. त्यामुळे त्यातील पदार्थांमध्ये बदल घडून येतात. परिणामी त्या पदार्थाचे सेवन करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरते.